अ‍ॅशेस मालिकेला लागले कोरोनाचे ग्रहण

Ashes Test Series 
England Cricket Team
Ashes Test Series England Cricket Teamesakal

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) यांच्यात अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Test Series) तिसरा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळवला जात आहे. या कसोटीचा पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पहिला डाव 185 धावात गुंडळला. पहिल्याच दिवशी अडचणीत सापडलेल्या इंग्लंड संघावर दुसरा दिवस सुरु होण्यापूर्वीच अजून एक मोठे संकट कोसळले. इंग्लंड संघातील चार जणांचा कोरोना (Corona) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

इंग्लंडच्या संघातील(England Cricket Team) सपोर्ट स्टाफमधील दोन सदस्य आणि दोन खेळाडूंच्या कुटुंबातील दोन असे एकूण चार जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आले आहेत. संध्या तरी या चार जणांच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. यानंतर सर्वच खेळाडूंची आरटी - पीसीआर चाचणी करण्यात आली. या वेळी सर्व खेळाडूंचा चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Ashes Test Series 
England Cricket Team
Video: अँडरसनने स्मिथला टाकलेला इनस्विंग होतोय चांगलाच Viral

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या अ‍ॅशेस मालिकेत (Ashes Test Series) फक्त इंग्लंडच्या संघात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. तर मालिका प्रसारित करणाऱ्या चॅनल स्टाफमधील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला (Pat Cummins) देखील विलगीकरणात रहावे लागले होते. तो दुसऱ्या कसोटीला मुकला होता.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्स कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याचे कळाल्यानंतर लगेचच त्याची कोरोना चाचणी केली होती. पॅट कमिन्सची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. तरीसुद्धा कमिन्सला विलगीकरणात रहावे लागले होते. आता तो पूर्णपणे फिट आहे आणि तिसऱ्या कसोटीत तो कांगारुंचे नेतृत्व करत आहे.

Ashes Test Series 
England Cricket Team
AUS vs ENG : कर्णधार कमिन्सचा कडवा प्रतिकार; मिळाली 82 धावांची आघाडी

काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडीज (West Indies) पाकिस्तान (Pakistan) दौऱ्यावर असताना सुरुवातीला वेस्ट इंडीजच्या काही खेळाडूंना कारोनाची लागण झाली होती. त्यावेळी इतर कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या विंडीजच्या खेळाडूंना घेऊन वेस्ट इंडीजने पाकिस्तानबरोबरची 3 टी 20 सामन्यांची मालिका पूर्ण केली होती.

मात्र आणखी खेळाडू कोरोनाग्रस्त झाल्याने त्यांना पाकिस्तान दौरा (West Indies Tour Of Pakistan)अर्ध्यावर सोडावा लागला होता. विंडीज संघाकडे खेळाडूंची कमतरता भासू लागल्याने पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिका स्थगित करण्यात आली होती. आता अ‍ॅशेस मालिकेत देखील कोरनाचा शिरकाव झाला आहे.

सध्या तरी कोणत्या खेळाडूला कोरोनाची लागण झालेली नाही. मात्र खेळाडूंच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली असल्याने अ‍ॅशेस मालिकेत कोरोनाची टांगती तलवार कायम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com