
हार्दिक पांड्यावर 'या' गोष्टीचा दबाव टाकू नका; नेहराजींचा सल्ला
नवी दिल्ली : या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्डकप होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाने आपल्या संघबांधणीसाठी आतापासूनच कंबर कसायला सुरूवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आजपासून सुरू होणाऱ्या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत अनेक युवा खेळाडूंची चाचपणी केली जाणार आरे. तसेच गुजरात टायटन्सला पहिले विजेतेपद जिंकून देणाऱ्या हार्दिक पांड्याचे टीम इंडियातील पुनरागमन देखील अंडर स्कॅनर असणार आहे. हार्दिक पांड्याला गुजरातकडून खेळताना जवळून पाहणाऱ्या आशिष नेहराने पांड्याबद्दल टीम मॅनेजमेंटला एक सल्ला दिला आहे. (Ashish Nehra Give Advice To Team India Management About Hardik Pandya Bowling)
हेही वाचा: Pak vs Wi: पाकच्या उपकर्णधार शादाबचा 'शानदार' कॅच; Video होतोय व्हायरल
गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहरा एका वेबसाईटशी बोलताना म्हणाला की, टीम इंडियाने प्रत्येक सामन्यात हार्दिक पांड्याला 4 षटके टाकण्याचा दबाव टाकू नये. टी 20 क्रिकेटमध्ये भारताला हार्दिकची गरज आहे हे सर्वांना माहिती आहे. मात्र टीम मॅनेजमेंटने हार्दिकला संपूर्ण चार षटके टाकण्यासाठी हळू हळू तयार करायला हवे. तो या फॉरमॅटसाठी फलंदाज म्हणून पूर्णपणे फिट आहे. मात्र त्याने जर आपला गोलंदाजी चांगल्या प्रकारे मॅनेज केली तर तो संघासाठी चांगलाच फायदेशीर ठरले.
नेहरा पुढे म्हणाला, 'आपण कायम हार्दिक गोलंदाजी करू शकणार की नाही याबाबत चर्चा करत असतो. हार्दिक फलंदाज म्हणून कोणत्याही फॉरमॅटमध्ये फिट होऊ शकतो. मात्र आपण टी 20 बाबत चर्चा करत आहोत. जर तो गोलंदाजी करू शकला तर त्याचा फायदा भारतालाच होईल.'
हेही वाचा: Indonesia Masters : लक्ष्य सेनची उपांतपूर्व फेरीत धडक
मात्र संघ व्यवस्थापनाला माझा सल्ला आहे की त्यांनी हार्दिकचा सहावा गोलंदाज म्हणून वापर करावा. हार्दिकवर प्रत्येक सामन्यात 4 षटके गोलंदाजी करण्याचा दबाव टाकू नये. टीम कॅम्बिनेशनचा विचार केला तर हार्दिकची संघाला गरज आहे कारण वरच्या क्रमांकावर फलंदाजी करणारे फलंदाज गोलंदाजी करू शकत नाहीत.
कायम हार्दिकचा वापर पाचवा गोलंदाज म्हणून केला जातो. जर तो फिट आहे तर त्याने गोलंदाजी केली पाहिजे. मात्र तो दुखापतीतून सावरत पुनरागमन करतोय. तो संपूर्ण आयपीएल हंगाम खेळला आहे. त्यामुळे त्याला हळू हळू तयार केले तर ही चांगली गोष्ट आहे.
Web Title: Ashish Nehra Give Advice To Team India Management About Hardik Pandya Bowling
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..