शाब्बास ! दुसरा नीरज चोप्रा; आशिष यादवने U20 World Championships मध्ये जिंकलं ऐतिहासिक पदक; शेतकऱ्याच्या लेकाची भरारी

Ashish Yadav historic silver medal in javelin throw: भारतीय भालाफेकीला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. आशीष यादवने U20 World Championships मध्ये भालाफेकीत रौप्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. या कामगिरीमुळे जागतिक स्तरावर भालाफेकीत पदक जिंकणारा तो नीरज चोप्रानंतरचा भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे.
Ashish Yadav wins silver medal in javelin at U20 World Championships

Ashish Yadav wins silver medal in javelin at U20 World Championships

Updated on

Ashish Yadav wins silver medal in javelin at U20 World Championships: उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावातून आलेल्या आशिष यादवने २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. त्याचे वडील शेती किंवा छोट्या व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात आणि आजचा दिवस त्यांच्यासाठी अभिमानास्पद राहिला... आर्थिक परिस्थिती बेताची असूनही आशिषच्या पालकांनी त्याच्या क्रीडा क्षेत्रातील आवडीला पूर्ण पाठिंबा दिला आणि त्याला खेळापासून कधीही मागे खेचले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com