इचलकरंजीच्या मळगे, भोंगाळे यांना वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

इचलकरंजी - पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत आज इचलकरंजीच्या दोन कन्यांनी सुवर्ण भरारी घेतली. ८७ किलोवरील गटात येथील युनिक वेटलिफ्टिंग सेंटरची अश्‍विनी मळगे, तर व्यंकटराव हायस्कूलची स्नेहल भोंगाळे हिने ८७ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविले. 

या स्पर्धेत इचलकरंजीच्या खेळाडूंनी आजअखेर या दोन सुवर्णपदकांसह चार रौप्य आणि एक कांस्य अशी सात पदके पटकावली आहेत. अश्‍विनी हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात कला शाखेत द्वितीय वर्षात शिकते आहे. तिने आज ८७ किलोवरील वजन गटात ८० किलो व १०४ किलो असे एकूण १८४ किलो वजन उचलून सुवर्ण पटकावले. ती येथील युनिक वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षक उत्तम मेंगणे व वर्धमान फ्रेंड्‌स सर्कल यांच्या नेतृत्वाखाली सराव करीत आहे. तिला दीपक पाटील, अभय पाटील, संदीप पाटील, राजेश चौगुले यांचे सहकार्य आहे. 

व्यंकटराव हायस्कूलची स्नेहल सुकुमार भोंगाळे हिने ८७ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविले. स्नेहलला मुख्याध्यापक संभाजी खोचरे, उपमुख्याध्यापक खोत, क्रीडा प्रशिक्षक गणेश बरगाले, अश्‍विनी कांबळे, माळी, पर्यवेक्षक म्हाकाळे यांचे मार्गदर्शन आहे. आजच्या या सुवर्णपदकासह दोन रौप्य व एक कांस्यपदक अशी एकूण चार पदके व्यंकटराव हायस्कूलच्या खेळाडूंनी पटकाविली आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashiwini Malge Snehal Bhongale wins Gold Medal in Weightlifting