IND vs PAK : रविवारी देखील असंच खेळू शकतो का? पाकच्या माजी गोलंदाजाचा घरचा आहेर

Asia Cup 2022 IND vs PAK Former Pakistan Pacer Yasir Arafat Statement After Pakistan Defeat Hongkong
Asia Cup 2022 IND vs PAK Former Pakistan Pacer Yasir Arafat Statement After Pakistan Defeat Hongkong esakal

Asia Cup 2022 IND vs PAK : आशिया कप 2022 ग्रुप A मधील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने हाँगकाँगचा 155 धावांनी पराभव केला होता. या विजयाबरोबरच पाकिस्तानने सुपर 4 मध्ये प्रवेश केला. आता त्यांचा मुकाबला कट्टर प्रतिस्पर्धी भारतासोबत 4 सप्टेंबर रविवारी रंगणार आहे. पाकिस्तानने हाँगकाँगविरूद्ध प्रथम फलंदाजी करतानात 20 षटकात 2 बाद 193 धावा उभारल्या होत्या. त्यानंतर हाँगकाँगला 10 षटकात 38 धावात गुंडाळत सामना खिशात टाकला.

Asia Cup 2022 IND vs PAK Former Pakistan Pacer Yasir Arafat Statement After Pakistan Defeat Hongkong
VIDEO : झिम्बाब्वेच्या खेळाडूंचा बसमध्ये धिंगाणा; कांगारूंवरचा विजय दणक्यात साजरा

मात्र या विजयावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज यासिर अराफात फारसा खूष नव्हता. त्याने ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्याने पाकिस्तान संघाला एक विनंती केली आहे. तो म्हणतो की, 'कृपया आपण आज जसं खेळलो तसंच रविवारी देखील खेळू शकतो का?'

Asia Cup 2022 IND vs PAK Former Pakistan Pacer Yasir Arafat Statement After Pakistan Defeat Hongkong
Mohammad Hafeez : भारत पैसा कमवून देतो म्हणून ICC चा लाडका; पाकचा माजी कर्णधार बरळला

यासिर अराफातने पाकिस्तानचा पहिल्या सामन्यात भारताविरूद्ध झालेल्या पराभवावर बोट ठेवले. आशिया कपच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 147 धावात पॅव्हेलियनमध्ये पोहचला होता. भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्याच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांचा निभाव लागला नव्हता.

असे असले तरी पाकिस्तानने देखील भारताला 147 धावा करताना चांगलेच जेरीस आणले होते. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारताचा निम्मा संघ बाद केला होता. अखेर भारताने अखेरच्या षटकात सामना जिंकला होता. आता भारत आणि पाकिस्तान रविवारी आशिया कपच्या सुपर 4 मध्ये भिडणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com