Naseem Shah : पदार्पण करणारा नसीम शाह पडला पण शेवटपर्यंत लढला

शाहीन आफ्रिदी दुखापतग्रस्त झाल्यानंतर पाकिस्तानच्या टी 20 संघात पदार्पण करण्याची संधी मिळालेल्या नसीम शाहने जबरदस्त गोलंदाजी केली
Asia Cup 2022 India Vs India
Asia Cup 2022 India Vs Indiasakal

Asia Cup 2022 India Vs India : आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारताने पाच विकेट्स राखून जिंकला. भारताला जरी फक्त 148 धावांचे आव्हान पार करायचे होते. मात्र पाकिस्तानच्या गोलंदजांनी दमदार मारा करत भारताचे टेन्शन वाढवले होते. विशेषकरून शाहीन आफ्रिदी दुखापतग्रस्त झाल्यानंतर पाकिस्तानच्या टी 20 संघात पदार्पण करण्याची संधी मिळालेल्या नसीम शाहने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने पहिल्याच षटकात भारताचा सलामीवीर केएल राहुलला बाद केले.

Asia Cup 2022 India Vs India
Ind vs Pak Asia Cup 2022 : हार्दिक पांड्याचा विजयी षटकार; भारताच्या विजयाची 5 कारणे

यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा अशी जगातील सर्वात विस्फोटक जोडी क्रीजवर असतानाही त्याने टिच्चून मारा करत त्यांना धावा करण्याची संधी दिली नाही. यामुळे हे दोघेही दबावात आला आणि फिरकीपटूंना मोठे फटके मारण्याच्या नादात ते बाद झाले. त्यानंतर रविंद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव यांनी चौथ्या विकेटसाठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हाही युवा नसीम शाह पाकिस्तानसाठी धावून आला. त्याने आक्रमक गिअर टाकलेल्या सूर्यकुमार यादवचा त्रिफळा उडवत भारताला मोठा धक्का दिला.

Asia Cup 2022 India Vs India
Ind vs Pak Asia Cup 2022 : हार्दिक पांड्याचा विजयी षटकार; भारताच्या विजयाची 5 कारणे

आपल्या शेवटच्या स्पेलमध्ये नसीमला क्रॅम्प येत होते. तो गोलंदाजी करताना पडला देखील. मात्र तरी देखील त्याने आपला स्पेल पूर्ण केला. त्याने 4 षटकात 27 धावा देत दोन विकेट घेतल्या. मात्र त्याचे प्रयत्न फार यशस्वी झाले नाहीत. हार्दिक पांड्याने 17 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या त्याला रविंद्र जडेजाने 29 चेंडूत 34 धावांची झुंजार खेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com