Asia Cup 2023 Ind vs Pak: 'त्या'ला बाहेर ठेवणे ही टीम इंडियाची सर्वात मोठी चूक...; दिग्गज खेळाडू रोहितवर बरसला

Asia Cup 2023 Ind vs Pak
Asia Cup 2023 Ind vs Pak

Asia Cup 2023 Ind vs Pak : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू झाला आहे. आशिया कपच्या या सामन्यावर क्रिकेटप्रेमींपासून तज्ज्ञांपर्यंत सर्वांचे लक्ष लागले आहे. सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. हा प्रश्न मोहम्मद शमीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्याचा आहे. भारताचे माजी दिग्गज खेळाडू संजय मांजरेकर म्हणाले की, मोहम्मद शमी बाहेर ठेवणे ही टीम इंडियाची सर्वात मोठी चूक आहे.

Asia Cup 2023 Ind vs Pak
IND vs PAK Rain Update : पावसामुळे सामना रद्द झाला तर होणार पाकिस्तानचा फायदा, भारताची वाढणार अडचण

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप सामना पल्लेकेले येथे खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, संघात दोन खेळाडूंचे पुनरागमन होत आहे. हे खेळाडू आहेत श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह. शार्दुल ठाकूर प्लेइंग इलेव्हनमधील तिसऱ्या सीमरची जबाबदारी स्वीकारणार आहे. मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णाला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले आहे.

Asia Cup 2023 Ind vs Pak
India Vs Pakistan : पाकिस्तानला पाणी पाजण्यासाठी ही आहे 'पंचसुत्री', कुलदीप विजयाची चावी

स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना संजय मांजरेकर यांनी भारतीय प्लेइंग इलेव्हनमधील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. मांजरेकर म्हणाले, शमीला बाहेर ठेवणे हा निर्णय मला थोडा चुकीचा वाटतो. प्रत्येकजण फलंदाजीच्या खोलीबद्दल बोलतो पण गोलंदाजीची खोली विसरतो. खेळपट्टी आणि स्विंगसाठी योग्य हवामान यात मोहम्मद शमी अधिक घातक ठरला असता यात शंका नाही. पण भारतीय संघाने शमीऐवजी शार्दुल ठाकूरला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवले आहे. कदाचित संघाला आपल्या फलंदाजीवर विशेषत: मधल्या फळीवर विश्वास नसेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com