India vs Pakistan Winner & Runner-Up Rewards
esakal
आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत-पाकिस्तान यांच्यात होणार आहे. तब्बल ४१ वर्षांच्या आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही संघ अंतिम सामन्यात आमने-सामने येत आहेत. त्यामुळे चाहत्यांना या सामान्याची उत्सुकता आहे. गेल्या दोन सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. तसेच पूर्वीच्या सामन्यांची आकडेवारी बघता भारताचं पारडं जड आहे. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी भारत प्रबळ दावेदार मानला जातो आहे.