India vs Oman Asia Cup 2025
esakal
आशिया करंडक स्पर्धेत सुपर-४ मधील प्रवेश निश्चित केलेल्या भारताचा आज ओमानविरुद्ध अखेरचा साखळी सामना होत आहे. त्यानंतर भारतीय संघ लगेचच पाकविरुद्ध रविवारी सुपर-४ मधील लढत खेळणार आहे. त्यामुळे या सामन्यापूर्वी आपले इतरही पर्याय तपासून घेण्याची संधी भारतीय संघाला आहे. दोन सामन्यांत भारतीय संघाचा खेळ चढ्या क्रमाने सुधारला आहे.