Suryakumar Yadav Dedicates Win to Army
esakal
कर्णधार सूर्यकुमार यादवसह भारतीय संघातील इतर खेळाडूंनी पाकिस्तानी संघाला आशियाई करंडकातील लढतीत बेदखल केले. सूर्यकुमारने नाणेफेकीच्या वेळी आणि त्यानंतर सामना संपल्यानंतरही पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. तसेच डगआउटमध्ये बसलेल्या खेळाडूंनीही सामना संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करता 'ड्रेसिंग रूम'मध्ये जाणे पसंत केले. भारतीय खेळाडूंनी या लढतीत सात विकेट राखून पाकिस्तानचा धुव्वा उडवत आपली मान ताठ राखली. आपला हा विजय सैन्यदलांना समर्पित असल्याचे भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने सामन्यानंतर जाहीरपणे सांगितले.