Ind vs Pak Asia Cup 2025 : भारत पाकिस्तान आज पुन्हा आमने-सामने; पायक्रॉफ्ट सामनाधिकारी म्हणून कायम राहणार?

Andy Pycroft Remains Match Referee? : आज भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येत आहे. ही लढत सुपर-४मधील असली तरी साखळी सामन्यात घडलेल्या घटनांचा दुसरा अंक आजही पाहायला मिळणार आहे. तसेच पायक्रॉफ्ट सामनाधिकारी म्हणून कायम राहणार का? याची उत्सूकताही अनेकांना आहे.
Andy Pycroft Remains Match Referee?

Andy Pycroft Remains Match Referee?

esakal

Updated on

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज पुन्हा एकदा भारत-पाक आमने-सामने येत आहे. ही लढत सुपर-४मधील असली तरी साखळी सामन्यात घडलेल्या घटनांचा दुसरा अंक आजही पाहायला मिळणार आहे. मागील पानावरून पुढे सुरू...अशीच उत्सुकता आजच्या लढतीसाठी आहे. सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्यासाठी स्पर्धेतून माघार घेण्याची दिलेली धमकी, त्यानंतर आयसीसीने उगारलेले दंड करण्याचे अस्त्र त्यामुळे पाक संघावर नाक मुठीत धरून स्पर्धेत कायम राहण्याची वेळ आली. आयसीसीनेही आपली भूमिका ठाम ठेवली आणि आजच्या सामन्यासाठीही पायक्रॉफ्ट यांना सामनाधिकारी म्हणून कायम ठेवल्याचे समजते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com