Sri Lanka vs Pakistan Super 4 Clash Asia Cup 2025
esakal
Sri Lanka and Pakistan players ready for a must-win Asia Cup Super 4 clash at Abu Dhabi : सुपर-४ मधील आपापले सलामीचे सामने गमावणाऱ्या श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना होत आहे. आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान कायम ठेवायचे असेल, तर या लढतीत विजय आवश्यक आहे. श्रीलंकेने गटातील तिन्ही सामने जिंकत अपराजित राहून सुपर-४ मध्ये प्रवेश केला होता, परंतु सुपर-४ मध्ये सलामीला त्यांना बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला. परिणामी, त्यांची लयही हरपली.