भारतीय पुरुष संघाला प्रथम श्रेणीचे विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

चुरशीच्या लढतीत कोरियावर मात
वुझी (चीन) - उपांत्यपूर्व फेरीत जपानविरुद्ध हरल्यानंतरही भारताने बुधवारी कोरियाचा 3-2 पराभव करून प्रथम श्रेणी गटाचे विजेतेपद मिळविले.

चुरशीच्या लढतीत कोरियावर मात
वुझी (चीन) - उपांत्यपूर्व फेरीत जपानविरुद्ध हरल्यानंतरही भारताने बुधवारी कोरियाचा 3-2 पराभव करून प्रथम श्रेणी गटाचे विजेतेपद मिळविले.

जपानपाठोपाठ भारताला हॉंगकॉंगकडूनही पराभव पत्करावा लागला. त्यानंतर भारत सातव्या क्रमांकासाठी खेळणार होते. या सामन्यात त्यांनी कोरियाला 3-1 असे हरवून प्रथम श्रेणी विजेतेपदाची कामगिरी केली. पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत आलेल्या खेळाडूंच्या मुख्य फेरीतील कामगिरीवर प्रथम श्रेणी विजेतेपद ठरते.

या लढतीसाठी भारताने शरथ कमालला विश्रांती दिली होती. त्याच्या गैरहजेरीत हरमीत देसाई, सौम्यजित घोष यांनी विजय मिळविले. हरमितने प्रथम पाक सिन योकचा 11-5, 11-3, 11-8, 6-11, 11-5 असा पराभव केला. त्यानंतर परतीच्या लढतीत त्याने चोई याचा 11-7, 11-5, 11-9 असा पराभव केला. त्यापूर्वी सौम्यजितने चोई याला 11-6, 11-9, 12-10 असे पराभूत केले. साथियन गणशेखरन याला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. कॅंग वी हून याने साथीयनचा 11-7, 11-9, 11-9 असा पराभव केला. परतीच्या एकेरीच्या लढतीत पाक सिन योक याने सौम्यजितचा 12-10, 6-11, 11-6, 8-11, 11-9 असा पराभव करून कोरियाला बरोबरी साधून दिली होती.

महिला गटात तैवानने सिंगापूरचा 3-0 असा पराभव करून विजेतेपद मिळविले.

Web Title: asia table tennis comeptition