मुंबई - मधुरिका पाटकर, पूजा सहस्रबुद्धे यांची आशियाई टेबल टेनिस स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. या संघात मुंबईच्या सनील शेट्टीचीही निवड करण्यात आली आहे.
आशियाई स्पर्धा वुझई (चीन) येथे रविवारपासून होईल. या संघात ए. शरथ कमल, मधुरिका या राष्ट्रीय विजेत्यांसह सौम्यजित घोष, जी. साथीयन, हरमीत देसाई, सनील शेट्टी, मनिका बात्रा, सुथिर्था मुखर्जी, पूजा सहस्रबुद्धे, मौमा दास यांचा समावेश आहे.
भारतीय संघासोबत परदेशी तज्ज्ञ मॅसिमो कॉन्स्टन्टिनी; तसेच मार्गदर्शक अरूप बसाक असतील. त्याचबरोबर प्रथमच भारतीय संघासाठी लालरिन पुईया या बचावात्मक खेळाडूची सरावातील सहकारी म्हणून निवड झाली आहे. केंद्रीय क्रीडा खात्याने त्यांच्याही समावेशास मंजुरी दिली आहे. संघाचे सध्या शांघायच्या नॅशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये सराव शिबिर सुरू आहे.
या स्पर्धेसाठी भारताचे गणेशन नीलकंठ अय्यर हे स्पर्धा व्यवस्थापक असतील; तर अतुल दुबे हे सहायक रेफरी असतील. महाराष्ट्राच्या सी. एल. थाडे; तसेच केरळचे अतूर साथीसे हे स्पर्धा व्यवस्थापक शिबिरास उपस्थित राहणार आहेत.
|