
दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपले वर्चस्व राखल्याचे दिसत आहे. शनिवारीही भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट सुरू होती.
या दिवशी सुवर्णपदक मिळलं नसलं, तरी शनिवारीचा दिवसही दिवस भारतासाठी चांगला ठरला. भारताच्या अनेक खेळाडूंनी रौप्य पदकावर नाव कोरले, यात धावपटू पारुल चौधरी हिचाही समावेश आहे. तिने हे रौप्य पदक जिंकत मोठा विक्रमही केला.