हॉकी इंडियाचा ट्रेलर दमदार; पण मॅचचा दि एन्ड बरोबरीत

17 डिसेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज रंगत पाहायला मिळेल.
indian hockey team vs south korea
indian hockey team vs south korea Twitter

आशियाई हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेतील Asian Champions Trophy) सलामीच्या लढतीत भारतीय हॉकी (Hockey India) संघाला 2-2 बरोबरीत समाधान मानावे लागले. ढाकाच्या (Dhaka) मैदानात रंगलेल्या दक्षिण कोरिया (South Korea) विरुद्धच्या लढती पहिल्या हाफमध्ये भारतीय संघाने दमदार खेळ दाखवला. पहिल्या दोन क्वार्टरमध्येच भारतीय संघाने दोन गोल डागले होते. पण तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये दक्षिण कोरियाने कमबॅक करत सामान 2-2 बरोबरीत राखण्यात यश मिळवलं. (asian champions trophy 2021 indian hockey team draw with south korea)

भारतीय संघाचा पुढील सामना बुधवारी यजमान बांगलादेश विरुद्ध रंगणार आहे. त्यानंतर 17 डिसेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज रंगत पाहायला मिळेल. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला ललित कुमारने केलेल्या गोलच्या जोरावर भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने पकड आणखी मजबूत केली. या क्वार्टरमध्ये दक्षिण कोरियाचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरवत भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये 1-0 आघाडी कामय राखली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये सलग तिसऱ्यांदा मिळालेल्या पेनल्टीवर हरमनप्रीत सिंहने गोल डागला. आणि भारताची आघाडी 2-0 अशी केली.

indian hockey team vs south korea
कोहलीसंदर्भात पसरलेली 'ती' बातमी खोटी; BCCI अधिकारी म्हणाले...

पहिल्या हाफमधील पिछाडी भरून काढण्यासाठी दक्षिण कोरियाने आक्रमक खेळाला सुरुवात केली. त्यांनी एका पाठोपाठ तीन पेनल्टी मिळवत भारतीय संघाला दबावात आणले. तिसऱ्या पेनल्टीवर गोल डागून दक्षिण कोरियाने स्कोअर बोर्ड 2-1 वर नेला. चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच गोल डागत त्यांनी सामना बरोबरीत आणला. अखेरच्या मिनिटाला भारताला मॅच विनिंग गोलची संधी प्राप्त झाली होती. पण स्ट्रायकर्स या संधीच सोन करण्यास हुकले आणि सामना बरोबरीत सुटला.

indian hockey team vs south korea
सिंधूचा थाट; 24 मिनिटांत प्रतिस्पर्ध्याचा खेळ खल्लास!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com