Asian Champions Trophy 2023 hockey : पेनल्टी कॉर्नरवरील अपयशावर मार्ग काढणार?, भारताचा आज मलेशियाशी सामना

Asian Champions Trophy 2023 hockey : पेनल्टी कॉर्नरवरील अपयशावर मार्ग काढणार?, भारताचा आज मलेशियाशी सामना

Asian Champions Trophy 2023 hockey : तीन वेळचे विजेते आणि यंदाही संभाव्य विजेत्या संघात आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला आशिया अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत आज होणाऱ्या मलेशियाविरुद्ध पेनल्टी कॉर्नरवर गोल न करण्याच्या अपयशावर मार्ग काढावा लागणार आहे.

राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत शुक्रवारी जपानविरुद्ध झालेल्या लढतीत पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या वाया घालवलेल्या संधी भारताच्या मुळावर आल्या त्यामुळे बरोबरीवर समाधान मानावे लागले. या सामन्यात भारताला तब्बल १५ पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु त्यातील केवळ एकावर गोल करता आला. कर्णधार हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, अमित रोहिदास आणि जुगराज सिंग असे अनुभवी खेळाडू असतानाही हे सर्व जण पेनल्टी कॉर्नवर अपयशी ठरले.

चीनविरुद्धच्या सलामीच्या लढतीत हीच परिस्थिती उलट होती. भारताने मिळवलेल्य ७-२ अशा विजयात सहा गोल पेनल्टी कॉर्नरवर करण्यात आले होते, पण लगेच दुसऱ्या दिवशी झालेल्या चीनविरुद्धच्या लढतीत हीच परिस्थिती कमालीची बदलली होती. जपानविरुद्धच्या १-१ बरोबरीत हरमनप्रीतने १५ पैकी एका पेनल्टी कॉर्नरवर गोल केला होता.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टॉन यांनी पेनल्टी कॉर्नरवरील या अपयशावर नाराजी व्यक्त केली. पूर्ण क्षमतेनुसार पेनल्टी कॉर्नरवर प्रयत्न केले नाहीत. खरे तर प्रत्येक प्रशिक्षकाची हीच चिंता असते. पेनल्टी कॉर्नर काय किंवा मैदानी गोल काय मिळलेल्या संधीचे सोने करायलाच हवे, असे ते म्हणाले.

सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या रचनेनुसार खेळ केला नाही, आपल्याला हवा तसा खेळ करण्यात आला. जपानविरुद्ध दोन-तीन तर सुवर्णसंधी गमावल्या. विजयापासून एक पाऊल दूर असताना बरोबरीवर समाधान मानावे लागणे चिंता करणारे आहे, असे फुल्टॉन यांनी सांगितले.

जपानविरुद्ध पेनल्टी कॉर्नर मिळवण्यात अधिक भर देण्यात आला, हीसुद्धा चिंता वाढवणारी बाब आहे. या प्रयत्नात मैदानी गोलकडे दुर्लक्ष झाले होते.

भारतीय बचावफळीचा कस

चीन आणि जपानच्या तुलनेत मलेशियाचा संघ मातब्बर आहे. शिवाय आता त्यांनी गटात आघाडी घेतली आहे, त्यामुळे उद्याची ही लढत भारतासाठी सोपी नसेल. तसेच त्यांचा फिरहान अशहारी हा आतापर्यंत झालेल्या सामन्यांत सर्वाधिक चार गोल करणारा खेळाडू आहे. हे चारही गोल त्याने मैदानी गोल केले आहेत, त्यामुळे भारतीय बचावफळीचा उद्या कस लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com