आमचा नाद करुच नका! पाकचा पुन्हा धुव्वा; भारताला कांस्य पदक

IND vs PAK Asian Champions Trophy Hockey
IND vs PAK Asian Champions Trophy Hockey Twitter

IND vs PAK Asian Champions Trophy Hockey Result: ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकचा दुसऱ्यांदा धुव्वा उडवला. सेमी फायनलमध्ये जपानकडून पराभूत झाल्यानंतर भारत-पाक यांच्या कांस्य पदकासाठी लढत झाली. यात भारतीय संघाने 4-3 अशी बाजी मारत कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेत भारतीय संघाने दुसऱ्यांदा पाकिस्तानला पराभूत केले. कांस्य पदकासाठीची लढत रंगतदार झाली. सरशेवटी यात टीम इंडियाने बाजी मारली.

भारतीय संघाने (Hockey India) ने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीत अपराजित राहून सेमी फायनलपर्यंत मजल मारली. मात्र ज्या जपानला त्यांनी 6-0 अशी मात दिली त्या जपानने मंगळवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाला 5-3 असा पराभवाचा धक्का दिला होता. पाकिस्तान विरुद्धच्या पदकासाठीच्या लढतीत पहिल्या मिनिटांतच भारतीय संघाने आघाडी घेतली. हरमनप्रीतच्या गोलच्या जोरावर भारताने 1-0 अशी आघाडी घेतली.

IND vs PAK Asian Champions Trophy Hockey
‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ प्रकरणात ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला 4 वर्षांचा तुरुंगवास

त्यानंतर सुमित (45 व्या मिनिटाला), वरूण कुमार (53 व्या मिनिटाला) आणि आकाशदीप सिंहने (57 व्या मिनिटाला ) गोल डागत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पाकिस्तानकडून अफराज (10 व्या मिनिटाला),अब्दुल राणा (33 व्या मिनिटाला) आणि अहमद नदीम (57 व्या मिनिटाला) गोल केला. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ही दुसरी लढत होती. राउंड रॉबिनमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला 3-1 अशी मात दिली होती.

IND vs PAK Asian Champions Trophy Hockey
गांगुलीने 'बायको आणि गर्लफ्रेंड' वक्तव्य करुन घेतला वाद ओढवून

बांगलादेशमधील ढाका येथे पार पडलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करुन दाखवली. सेमी फायनलमध्ये जपानकडून पराभूत झाल्यानंतर त्यांनी दमदार कमबॅक करत कांस्य पदक जिंकले. या स्पर्धेतील सलामीच्या लढती दक्षिण कोरिया विरुद्धचा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता. बांगलादेश, पाकिस्तान आणि जपान यांच्या विरुद्ध दमदार विजय नोंदवत भारतीय संघाने आशियाई स्पर्धेची सेमी फायनल गाठली. साखळी फेरीत जपानला भारतीय संघाने 6-0 असे पराभूत केले होते. त्यामुळे भारतीय संघ त्यांना नमवत फायनल गाठेल, असेच वाटत होते. पण दुसऱ्या सेमी फायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला. या पराभवामुळे आशियाई चॅम्पियन होण्याची संधी हुकली. पण अखेर तिसऱ्या क्रमाकांसाठी पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला नमवत टीम इंडियाने स्पर्धेचा शेवट गोड केला.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com