Asian Champions Trophy: आशियाई करंडकाची रंगीत तालीम; भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज
Harmanpreet Singh: भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने सांगितले की ऑस्ट्रेलियाविरुद्धची आगामी मालिका आशियाई करंडकासाठी रंगीत तालीम ठरेल. संघाला खेळामध्ये सुधारणा करण्याची ही उत्तम संधी आहे.
बंगळूर : आशियाई हॉकी करंडक यंदा भारतातील बिहारमधील राजगीरमध्ये २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान रंगणार आहे. त्याआधी भारतीय पुरुष हॉकी संघ १५ ते २१ ऑगस्टदरम्यान चार सामन्यांची मालिका खेळणार आहे.