फुगवलेल्या भारतीय संघास टाचणी?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली / मुंबई - सातत्याने फुगवल्या जात असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या पथकास अखेर संयोजकांनी टाचणी लावली आहे. मुदत संपल्यानंतर पाठवलेल्या प्रवेशिका स्वीकारण्यास संयोजकांनी नकार दिल्याचे समजते. 

न्यायालयात धाव घेत तायक्वांदोच्या तीन खेळाडू, तसेच बोट रेस संघाने भारतीय ऑलिंपिक संघटनेस आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी  आपली निवड करण्यास भाग पाडले. भारतीय ऑलिंपिक संघटनेने त्यांची नावेही पाठवली, पण संयोजकांनी अद्याप ती स्वीकारलीच नसल्याचे समजते. ‘आयओए’ने यास दुजोरा दिला आहे, पण क्रीडा मंत्रालयास अद्याप याची काहीही कल्पना नाही. 
प्रथम अश्‍वारोहक त्यानंतर तायक्वांदो स्पर्धक न्यायालयात गेले.

न्यायालयाच्या आदेशानुसार यांचा संघात समावेश करण्यात आला. हेच बोट रेसिंग संघाबाबत घडले. आता या सर्व प्रवेशिकांबाबतची संदिग्धता ११ ऑगस्टपर्यंत कायम राहील. त्यादिवशी जकार्तामध्ये सदस्य नोंदणी समितीची बैठक आहे. त्या वेळी अंतिम निर्णय होईल.

Web Title: Asian Games 2018 India Team