Asian Games 2023 : भारतीय महिला क्रिकेट संघाचे पदक पक्के

Asian Games 2023 : भारतीय महिला क्रिकेट संघाचे पदक पक्के

बांगलादेशवर मात; सुवर्णपदकाच्या लढतीत श्रीलंकेशी लढणार

हांग चौऊ - भारताच्या महिला क्रिकेट संघाने रविवारी बांगलादेश संघावर ८ विकेट व ७० चेंडू राखून विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक पक्के झाले आहे. आता सुवर्णपदकासाठी उद्या (ता. २५) होणार असलेल्या लढतीत भारतीय महिला संघासमोर श्रीलंकेचे आव्हान असणार आहे. श्रीलंकेने उपांत्य फेरीच्या लढतीत पाकिस्तानला ६ विकेट राखून धूळ चारली.

बांगलादेश संघाकडून भारतीय संघासमोर ५२ धावांचे माफक आव्हान ठेवण्यात आले होते. भारतीय संघाने २ फलंदाज गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. स्मृती मानधना हिला मारूफा अख्तेर हिने ७ धावांवर बाद केले. शेफाली वर्मा हिने १७ धावांची खेळी केली. मात्र फाहिमा खातून हिच्या गोलंदाजीवर ती बाद झाली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज (नाबाद २० धावा) व कनिका अहुजा (नाबाद १ धाव) या जोडीने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, त्याआधी बांगलादेशच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्यांचा डाव १७.५ षटकांत ५१ धावांवरच गारद झाला. कर्णधार निगार सुल्ताना हिने सर्वाधिक १२ धावा केल्या. इतर सर्व फलंदाजांना एकेरी धावसंख्याच करता आली. बांगलादेशचे पाच फलंदाज शून्यावरच बाद झाले. भारताकडून मध्यमगती गोलंदाज पूजा वस्त्रकार हिने १७ धावा देत चार फलंदाजांना तंबूत पाठवले.

Asian Games 2023 : भारतीय महिला क्रिकेट संघाचे पदक पक्के
Solapur : मोहोळ विधानसभेची निवडणूक पुन्हा लढवणार -रमेश कदम

पदकांसाठी आज झुंज

महिला क्रिकेटमध्ये उद्या पदकांसाठी झुंज रंगणार आहे. भारत-श्रीलंका यांच्यामध्ये सुवर्णपदकासाठी लढत होईल. तसेच पाकिस्तान- बांगलादेश हे देश ब्राँझपदकासाठी एकमेकांसमोर उभे ठाकतील.

संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश सर्व बाद ५१ धावा (निगार सुल्ताना १२, नाहिदा अख्तेर नाबाद ९, सोभना मोस्तरी ८, रितू मोनी ८, पूजा वस्त्रकार ४/१७) पराभूत वि. भारत ८.२ षटकांत २ बाद ५२ धावा (शेफाली वर्मा १७, जेमिमा रॉड्रिग्ज नाबाद २०, कनिका अहुजा नाबाद १).

Asian Games 2023 : भारतीय महिला क्रिकेट संघाचे पदक पक्के
Satara : 'आंबेडकरांच्या नावाची कमान पाडणाऱ्या मनुवादी प्रवृत्तींचा निषेध'; बेडगच्या घटनेवरुन RPI आक्रमक

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com