Satara : 'आंबेडकरांच्या नावाची कमान पाडणाऱ्या मनुवादी प्रवृत्तींचा निषेध'; बेडगच्या घटनेवरुन RPI आक्रमक

या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
Bedag Babasaheb Ambedkar Welcome Arch Case
Bedag Babasaheb Ambedkar Welcome Arch Caseesakal
Summary

हा मार्च पुणे, रायगड करत मुंबईत मंत्रालयाकडे जाणार आहे.

सातारा : बेडग (ता. मिरज, जि. सांगली) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असणारी स्वागत कमान (Dr. Babasaheb Ambedkar Welcome Arch) अज्ञातांकडून पाडण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी बेडग ते मुंबई असा ‘लाँग मार्च’ आयोजिला आहे.

हा ‘लॉंग मार्च’ काल साताऱ्यात दाखल झाला. या वेळी रिपब्लिकन पक्षाने वाढेफाटा येथे उड्डाणपुलावर ठिय्या आंदोलन केल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली. बेडग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ गावातील आंबेडकरप्रेमी अनुयायांनी आपली घरे बंद करून बेडग ते मुंबई असा ‘लाँग मार्च’ आयोजिला आहे.

Bedag Babasaheb Ambedkar Welcome Arch Case
Sharad Ponkshe : 'बाजीराव पेशवे हा छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा धुरंधर वीरपुरुष होता'

हा ‘लाँग मार्च’ गुरुवारी रात्री कऱ्हाडवरून साताऱ्यात दाखल झाला. शुक्रवारी सकाळी रिपाईंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३०० आंदोलक चालत पुण्याच्या दिशेने निघाले. वाढेफाटा येथील उड्डाण पुलावर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत निषेधाच्या घोषणा देऊन कमान पाडणाऱ्या मनुवादी प्रवृत्तींचा निषेध केला.

Bedag Babasaheb Ambedkar Welcome Arch Case
Rohit Pawar : श्रीकांत शिंदेंसह गटाच्या सर्वच खासदारांना कमळावर निवडणूक लढवावी लागेल; रोहित पवारांनी दिला धोक्याचा इशारा

या आंदोलनात संघटनेचे उपाध्यक्ष प्रतीक गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष अण्णा वायदंडे, युवक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब गायकवाड, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष नीलेश गाडे आदी उपस्थित होते. हा मार्च पुणे, रायगड करत मुंबईत मंत्रालयाकडे जाणार आहे.

Bedag Babasaheb Ambedkar Welcome Arch Case
Miraj Ganeshotsav : ठाकरे सेनेच्या कमानीवर गुवाहाटीचे चित्र; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप, वाद चिघळण्याची शक्यता

या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. साताऱ्याचे पोलिस उपअधीक्षक किरण सूर्यवंशी, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक अजित कोकाटे, पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, धनंजय फडतरे, तसेच सुमारे शंभर ते दीडशे पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याने वळविण्यात आली. अर्ध्या तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर आंदोलक पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com