Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

India Wins Archery & Shooting Gold Medals : बुधवारचा दिवस आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत भारतासाठी खास ठरला आहे. तिरंदाजीच्या कम्पाऊंड प्रकारांमध्ये तीन सुवर्णपदके, तर नेमबाजीच्या मिश्र ट्रॅप प्रकारातही सुवर्णपदक मिळाले आहे.
India Men's Compound Team win Gold | Asian Games 2026

India Men's Compound Team win Gold | Asian Games 2026

Sakal

Updated on: 

Asian Games 2026, Archery and Shooting Gold: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत बुधवारचा दिवस भारतासाठी सोनियाचा ठरला आहे. भारताने तब्बल चार सुवर्णपदकं पटकावली असून यातील तीन तिरंदाजीच्या कम्पाऊंड प्रकारांमध्ये मिळाली आहेत.

तसेच नेमबाज नीरू धांडा आणि कायनान चेनाई यांनीही मिश्र ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. बुधवारच्या दिवसातील भारताचे चौथे सुवर्णपदक पुरुषांच्या तिरंदाजी संघाने मिळवले. आता भारताच्या खात्यात १० सुवर्णपदके झाली आहेत.

India Men's Compound Team win Gold | Asian Games 2026
Asian Games, Archery: साताऱ्याच्या साहिलने चिकितासह जिंकलं गोल्ड मेडल! तिरंदाजीत भारताला दोन तासात दुसरं सुवर्णपदक
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com