

Sahil Jadhav and Chikitha Taniparthi Gold Medal | Asian Games
Sakal
India Mix Team Archery Asian Games Gold and Secure LA 2028 Olympic Quota: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत बुधवारचा दिवस भारतीय तिरंदाजांनी गाजवला आहे. सुरुवातीलाच भारताच्या महिला तिरंदाजी संघाने सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर दोन तासातच भारताच्या साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी यांनी कंपाऊंड मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
त्यामुळे आता भारताच्या खात्यात ८ सुवर्णपदकांची भर पडली आहे. दरम्यान, या सुवर्णपदकासह साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी (Sahil Jadhav & Chikitha Taniparthi) यांनी २०२८ च्या ऑलिम्पिकसाठीही पात्रता मिळवली आहे.