India vs Iran Womens Kabaddi Asian Games 2026
esakal
India women kabaddi team wins gold medal Asian Games 2026: भारतीय महिला कबड्डी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक कामय राखताना अंतिम सामन्यात इराणची कडवी टक्कर मोडून काढली. पहिल्या हाफमध्ये अवघ्या ६ गुणांची आघाडी घेणाऱ्या भारताला पुढील खेळात चांगली टक्कर मिळाली. इराणने यापूर्वीही भारतीय संघाला सडेतोड उत्तर दिले आहे आणि आजही त्यांच्याकडून असाच खेळ झाला. शेवटची ८ मिनिटे असताना इराणने लोन चढवून सामना एका गुणाच्या फरकावर आणला. त्यानंतर मॅचमध्ये रंगत आली, एकेका गुणासाठी दोन्ही संघ जोर लावताना दिसले. पण, भारताने शेवटच्या पाच मिनिटांत पुनरागमन करून सुवर्णपदक नावावर केले. भारतीय महिलांचे हे आशियाई स्पर्धेतील चौथे ( २०१०, २०१४, २०२२ आणि २०२६) सुवर्णपदक आहे.