Asian Games 2026: मीराबाई चानूची स्वप्नपूर्ती! आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले पहिले पदक; २८ वर्षांचा भारताचा दुष्काळ संपवला...

MIRABAI CHANU MAKES HISTORY AT ASIAN GAMES 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या पदकतालिकेत आणखी भर पडली आहे. भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने अखेर आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले पदक जिंकत आपले मोठे स्वप्न पूर्ण केले.
MIRABAI CHANU| ASIAN GAMES 2026

MIRABAI CHANU Silver Medal AT ASIAN GAMES 2026

esakal

Updated on

Mirabai Chanu wins first Asian Games medal 2026 : भारतीय नेमबाजांनी सांघिक गटात दोन कांस्यपदकांची कमाई करून दिली. महिला व पुरुष स्किट सांघिक प्रकारात भारताला ही पदकं मिळाली. पण, जय मीनाने सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकलेले कांस्यपदक ऐतिहासिक ठरले. या क्रीडा प्रकारातील भारताचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिलेच पदक ठरले. उपांत्य फेरीत जयला पराभवाचा सामना करावा लागला, दुखापतीमुळे त्याच्या खेळावर परिणाम जाणवत होता. मीराबाई चानूच्या ( MIRABAI CHANU SAIKHOM) कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते, कारण तिला आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत पदक जिंकता आले नव्हते. मात्र, आज तिने हे स्वप्न पूर्ण केले आणि विक्रमी 'भार' उचलून पदक निश्चित केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com