Vedaant Madhavan selected in India swimming squad for Asian Games 2026
esakal
R Madhavan son Vedaant Madhavan eyes Asian Games gold medal: दोनवेळचा ऑलिम्पिकपटू श्रीहरी नटराज आणि साजन प्रकाश, या दोन स्टार जलतरणपटूंसह वेदांत माधवन याची आशियाई स्पर्धा २०२६ साठी निवडलेल्या जलतरण संघात निवड झाली आहे. जपानमध्ये यंदाची आशियाई स्पर्धा होणार आहे आणि २० ते २५ सप्टेंबर या कालावधीत जलतरण स्पर्धा होणार आहे. २१ वर्षीय वेदांत हा बॉलिवूड अभिनेता आर माधवन याचा मुलगा आहे आणि तो आशियाई स्पर्धेत २०० मीटर फ्री स्टाईल व २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सहभाग घेणार आहे. याशिवाय तो भारताच्या ४ बाय २०० मीटर फ्री स्टाईल रिले संघाचाही सदस्य आहे.