Asian Games 2026: राही सरनोबतचा एक 'निशाणा' चुकला अन् भारताचे पदक गेलं; 'Frame hit' चा फुल ड्रामा, ५५ हजार भरून अपील केले पण...

Rahi Sarnobat frame hit Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजी संघाचे पदक एका शॉटमुळे हुकले. महिलांच्या २५ मीटर पिस्तूल टीम प्रकारात राही सरनोबतच्या एका शॉटला फ्रेम हिट दिल्यावरून गोंधळ झाला आणि परिणामी भारताला पदकापासून वंचित रहावे लागले.
Asian Games 2026

Rahi Sarnobat frame hit Asian Games 2026

esakal

Updated on: 

India 25m pistol team medal Asian Games 2026: भारतीय महिला नेमबाज संघाचे सुवर्णपदक अवघ्या १६ गुणांनी हुकले. २५ मीटर पिस्तूल सांघिक गटात भारताची नेमबाज राही सरनोबत ( Rahi Sarnobat) हिची एक चूक महागात पडली आणि भारताचे हातचे पदक निसटले. राहीचा एक निशाणा फ्रेम हिट ( Frame Hit) ठरवला गेला आणि त्यावरून रामायण झाले. फ्रेम हिट असल्याने राहीला एकही गुण मिळाला नाही आणि तिथेच भारताच्या हातून पदक गेले. राही, मनू भाकेर व इशा सिंग यांचा समावेश असलेल्या या संघाला १७२७ गुणांसह पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com