Indian women shooters Raiza Dhillon
esakal
Manu Bhaker finishes fifth in 10m air pistol final : भारतीय महिला नेमबाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारी कांस्यपदकाची कमाई केली. रायझा ढिल्लन, परिनाझ धालीवाल आणि महेश्वरी चौहान यांच्या भारतीय महिला स्किट संघाने एकूण ३३१ गुणांसह महिलांच्या स्किट स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. रायझा आणि परिनाझ यांनी अनुक्रमे १२५ पैकी प्रत्येकी १११ गुणांची कमाई केली, तर महेश्वरीने १०९ गुण कमावले. चीनने ३५७ गुणांसह सुवर्णपदक, तर कझाकस्तानने ३३६ गुणांसह रौप्यपदक पटकावले.