Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

SAWAN BARWAL’S NEVER-GIVE-UP RUN: भारताच्या सावन बरवालने पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये रौप्यपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. तब्बल ४४ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये भारताला पदक मिळाले.
ASIAN GAMES 2026

ASIAN GAMES 2026: WHO IS SAWAN BARWAL?

esakal

Updated on: 

ASIAN GAMES 2026: WHO IS SAWAN BARWAL? हिमाचल प्रदेशच्या सावन बरवालने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. मॅरेथॉन स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकून आशियाई स्पर्धेतील या क्रीडा प्रकारातील पदकाचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला. सावनसाठी ही शर्यत इतकी सोपी नव्हती... सावन बरवालने रॉटरडॅम मॅरेथॉनमध्ये २:११:५८ अशी वेळ नोंदवून, १९७८ मध्ये शिवनाथ सिंग यांनी नोंदवलेला २:१२:०० चा विक्रम मोडला. शर्यत संपायला अवघे १०० मीटर अंतर बाकी असताना हा २८ वर्षीय खेळाडू कोसळल्याने, विक्रम मोडण्याचा हा प्रयत्न जवळजवळ फसला होता. पण, त्याने जिद्द सोडली नाही आणि पुन्हा उभा राहून तो पळाला आणि विक्रम नोंदवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com