Asian Games 2023 : पारुल चौधरीने प्रथमच जिंकले सुवर्ण

अनु राणीचे भालाफेकीत यश, डेकॅथलॉनमध्ये तब्बल ४९ वर्षांनंतर मिळाले पदक
asian games
asian games sakal

हौंग् चौऊ - स्टीपलचेस शर्यतीत रौप्यपदक जिंकल्यानंतर भारताच्या पारुल चौधरीने मंगळवारी पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. महिलांच्या या शर्यतीतील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक होय. राष्ट्रकुल स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या अनु राणीनेही भालाफेकीत सुवर्णपदक जिंकून प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकण्याची किमया केली.

भारतीय ॲथलिट्‍सने सहा पदके जिंकून आपली पदकांची एकूण संख्या २२ वर नेली आहे. जकार्ता येथील स्पर्धेत भारतीय ॲथलिट्सने २० पदके जिंकली होती.उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील असलेल्या २९ वर्षीय पारुलने जबरदस्त वेग कायम ठेवत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव कायम ठेवला होता.

शेवटच्या ३० मीटरमध्ये मुसंडी मारून तिने जपानच्या रिरिका हिरोनाकाला मागे टाकले आणि १५ मिनिटे १४.७५ सेकंदात सुवर्णपदक निश्चित केले. आशियाई क्रीडा स्पर्धेत १९९८ मध्ये सर्वप्रथम पाच हजार मीटरची शर्यत आयोजित करण्यात आली होती. तेव्हापासून सुनीता राणी, प्रीजा श्रीधरन यांनी रौप्यपदके जिंकली; मात्र कुणालाही सुवर्णपदकाचा आनंद घेता आला नव्हता. हा आनंद आज पारुलने मिळवला. भारताची दुसरी स्पर्धक अंकिताला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

asian games
Asian Games 2023 : बॉक्सर प्रिती पवारने जिंकले कांस्य पदक; भारताची पदकसंख्या 62 वर

पुरुषांच्या ८०० मीटर शर्यतीत महम्मद अफजलने रौप्यपदक जिंकून आणखी एका पदकाची भर घातली. त्याने १ मिनीट ४८.४३ सेकंद वेळ दिली. कृष्णन कुमारला लेन बदलल्याबद्दल अपात्र ठरवण्यात आले. तिहेरी उडीत प्रवीण चित्रावेलसोबत अब्दुला अबुबकरकडूनही पदकाची अपेक्षा होती; मात्र तो अपेक्षापूर्ती करू शकला नाही. प्रवीणने १६.६८ मीटर कामगिरी करीत ब्राँझपदक जिंकले. अब्दुला चौथा आला.

राष्ट्रकुल व आशियाई ॲथलेटिक्समध्ये ब्राँझपदक जिंकणाऱ्या तेजस्विन शंकरने ॲथलिट्चा कस पाहणाऱ्या डेकॅथलॉनमध्ये ७६६६ गुणांसह रौप्यपदक जिंकले. डेकॅथलॉनमध्ये शेवटचे पदक १९७४ च्या तेहरान स्पर्धेत आले होते. त्या वेळी विजय सिंह चौहान यांनी सुवर्ण; तर सुरेश बाबू यांनी ब्राँझपदक जिंकले होते. हा दुष्काळ अखेर दिल्लीचा असलेल्या तेजस्विनने संपवला.

महिलांच्या भालाफेकीत उत्तर प्रदेशची आणखी एक कन्या अनु राणीने सुवर्णपदक जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. तिने ६२.६२ मीटर अंतरावर भाला भिरकावला. यापूर्वी तिला कधीही आशियाई पातळीवर सुवर्णपदक जिंकता आले नव्हते. २०१४ च्या स्पर्धेत ती ब्राँझपदकाची मानकरी होती.

asian games
Chh. Sambhaji Nagar : गुंडांकरवी बिल्डरची रो-हाऊसधारकांना बेदम मारहाण! काहींची फुटली डोकी; महिला, मुलांनाही सोडले नाही

रामराजला ब्राँझपदक

प्राथमिक फेरीत पी. टी. उषाच्या ५५.४२ सेकंद या ३९ वर्षे जुन्या राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी करणाऱ्या वित्या रामराजला ४०० मीटर हर्डल्स शर्यतीत ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत तिला प्राथमिक फेरीतील कामगिरीत सुधारणा करता आली नाही. रौप्यपदक जिंकणाऱ्या मिश्र रिले संघाची सदस्य असलेल्या वित्याने ५५.६८ सेकंद अशी वेळ दिली. यामुळे पॅरिस ऑलिंपिकसाठी असलेली ५४.८५ सेकंदाची पात्रता गाठण्यातही तिला अपयश आले.

asian games
Satara News : ‘जिहे-कठापूर, टेंभू’च्‍या पाण्‍याचा फायदा

पाकच्या अर्शदची माघार; नीरज, किशोर दावेदार

पुरुषांच्या भालाफेकीत भारताचा विश्वविजेता नीरज चोप्रा व पाकिस्तानचा राष्ट्रकुल विजेता अर्शद नदीम अशी लढत पाहायला मिळेल, अशी शक्यता होती; मात्र गुडघ्याच्या दुखापतीमुळे अर्शदने माघार घेतल्याचे जाहीर करण्यात आल्याने आता नीरज सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार आहे. त्याचप्रमाणे किशोर जेनाला पदक जिंकण्याची नामी संधी आहे.c

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com