Asian Games : देवेंद्र फडणवीसांनी केले ओजसचे कौतुक ;आई-वडिलांशी संपर्क साधून व्यक्त केला आनंद

आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या ओजसने ऐतिहासिक कामगिरी करत नागपूर व विदर्भासह देशाला नावलौकिक मिळवून दिला आहे.
asian games
asian gamessakal

नागपूर - हांगचौऊ (चीन) येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीच्या मिश्र कम्पाउंड आणि सांघिक कम्पाउंड प्रकारात दोन सुवर्णपदके पटकावून इतिहास घडविणाऱ्या नागपूरकर ओजस देवतळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी ओजसच्या आई-वडिलांशी फोनद्वारे संवाद साधून ओजसचे व त्यांचे कौतुक करीत पुढील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या ओजसने ऐतिहासिक कामगिरी करत नागपूर व विदर्भासह देशाला नावलौकिक मिळवून दिला आहे. या कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करून ओजसचे अभिनंदन केले. त्याचवेळी ओजसचे वडील प्रवीण देवतळे व आई अर्चना देवतळे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. ओजसची कामगिरी देशवासियांसाठी आनंद व अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे.

२१ वर्षीय ओजसने आशियाई स्पर्धेत आतापर्यंत दोन सुवर्ण पदके जिंकली असून, तो पुरुषांच्या कम्पाउंड प्रकाराच्याही अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे त्याला सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. सुवर्णपदकासाठी ओजसची निर्णायक लढत उद्या, शनिवारी भारताच्याच अभिषेक वर्मा विरुद्ध होणार आहे. या प्रकारातही ओजस देशाला सुवर्णपदक जिंकून देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. नागपुरात दर्जेदार तिरंदाज घडावे, यासाठी तिरंदाजीच्या विशेष सोयी उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com