asian hockey cup 2025 india vs malaysia
Esakal
यजमान भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी झालेल्या आशियाई हॉकी करंडकातील 'सुपर फोर' फेरीमधील लढतीत मलेशियावर ४-१ असा दमदार विजय मिळवला आणि अंतिम फेरीत पोहोचण्याचे आव्हान कायम राखले. मनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, शिलानंद लाक्रा व विवेक सागर प्रसाद यांनी प्रत्येकी एक गोल करीत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.