Asian Kho-Kho : भारताच्या संघांत महाराष्ट्राचे सहा खेळाडू

आशियाई खो-खो स्पर्धेसाठी संघांची घोषणा
Kho-Kho
Kho-Kho sakal

मुंबई : आसाम, गुवाहाटी येथे उद्यापासून (ता. २०) आशियाई खो-खो स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी भारताच्या दोन्ही (पुरुष व महिला) संघांची घोषणा रविवारी करण्यात आली असून पुरुषांच्या व महिलांच्या अशा दोन्ही संघांमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येकी तीन अशा एकूण सहा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

पुरुषांच्या संघात अक्षय भांगरे, सुयश गरगटे व अनिकेत पोटे या महाराष्ट्राच्या खेळाडूंना संधी देण्यात आली असून महिलांच्या संघात प्रियंका इंगळे, गौरी शिंदे व अपेक्षा सुतार यांची निवड करण्यात आली आहे. या संघात राखीव खेळाडूंमध्ये रेश्‍मा राठोड हिचीही वर्णी लागली आहे. तसेच या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील डॉ. चंद्रजीत जाधव व सचिन गोडबोले यांची उपसमितीवर निवड करण्यात आली आहे.

Kho-Kho
Mumbai News : वरळी सी फेसवर भीषण अपघात; महिलेचा जागी मृत्यू

भारतीय पुरुष संघ : अमित पाटील, अक्षय गणपुले व अरुण गुणकी (सर्व रेल्वे), अक्षय भांगरे, सुयश गरगटे व अनिकेत पोटे (सर्व महाराष्ट्र), अवधूत पाटील (कोल्हापूर), एम. के. गौतम (कर्नाटक), ए. एस. एन. आगिरेड्डी (आंध्र प्रदेश), मदन (दिल्ली), एस. संथरू (तमिळनाडू), व्ही. कबिलन (पुदूचेरी), सचिन भारगो (मध्य भारत), आकाश (उत्तर प्रदेश) व मुकेश (राजस्थान). राखीव : सुभम काची (मध्य प्रदेश), सीबीन एम. (केरळ) व ध्रुव (हरयाना).

Kho-Kho
Nagpur : DPC ३०० कोटी जाणार परत, स्थगितीचा फटका

भारतीय महिला संघ : प्रियंका इंगळे, गौरी शिंदे व अपेक्षा सुतार (सर्व महाराष्ट्र), निकिता पवार (भारतीय विमान प्राधिकरण), परविन निशा (दिल्ली), एल. मोनिका (कर्नाटक), बिन्दू (हरयाना), निर्मला भाटी (राजस्थान), गुरवीर कौर (पंजाब), अर्चना माझी (ओडिशा), दीपिका चौधरी (पी. बंगाल), मीनू (हरयाणा), रंजना (आसाम), नसरिन (भारतीय विमान प्राधिकरण) व मधू (दिल्ली). राखीव : रीहका (मध्य भारत), मोनिका (बिहार) व रेश्मा राठोड (महाराष्ट्र).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com