Asian Para Games 2023 : दोन्ही हात नसलेल्या शीतलला पॅरा आशियाई स्पर्धेत दोन सुवर्ण

दोन्ही हात नसल्यामुळे शीतल देवी पाय आणि तोंडाच्या मदतीने तिरंदाजी करते
para games
para games sakal

हांग् चौऊ - येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा स्पर्धेत दोन्ही हात नसलेली भारताची लहान तिरंदाज शीतल देवी हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात एकाच स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवणारी ती पहिली भारतीय महिली ठरली. जम्मू-काश्मीरच्या या १६ वर्षीय शीतल देवीचे हे स्पर्धेतील एकूण तिसरे पदक ठरले. या आठवड्याच्या सुरुवातीला तिने कंपाऊंड मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण आणि महिलांच्या दुहेरीत रौप्यपदक जिंकले होते.

दोन्ही हात नसल्यामुळे शीतल देवी पाय आणि तोंडाच्या मदतीने तिरंदाजी करते. काश्मीरमधील क्षीतवार या दुर्गम भागातील लष्करी कॅम्पमधील अधिकाऱ्यांना तिचा शोध लागला, त्यानंतर भारतीय आर्मीने तिला लहानपणीच दत्तक घेतले. जुलै महिन्यात झालेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत विजेतेपद मिळवणारी ती पहिली दोन्ही हात नसलेली तिरंदाज ठरली होती. आजच्या अंतिम सामन्यात तिने सिंगापूरच्या अलिम नूर शाहिदा हिचा १४४-१४२ असा पराभव केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com