Dilip Gavit wins gold in men's 100m T47 at Asian Para Games 2026
esakal
India crosses 50-medal mark at Asian Para Games 2026: भारताने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये बुधवारी आतापर्यंत पाच सुवर्ण, ८ रौप्य आणि ९ कांस्यपदकांची कमाई केली आहे. सांगलीच्या सचिन खिलारीपाठोपाठ नाशिकच्या दिलीप गावितने ( Dilip Gavit ) भारताच्या खात्यात सुवर्णपदक जमा केले. धावपटू सिमरन हिनेही महिलांच्या १०० मीटर टी १२ प्रकारात १२.०२ सेकंदाच्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. भारताने यंदाच्या पॅरा स्पर्धेत आतापर्यंत १४ सुवर्ण, २० रौप्य व २३ कांस्य अशी एकूण ५७ पदकांची कमाई करताना पदकतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे.