India Women’s Hockey Team Thrash Thailand
esakal
Indian Women’s Hockey Team defeated Thailand 11-0 in their Asian Hockey Cup 2025 opener : हँगझाऊ (चीन), ता. ५ : भारतीय महिला संघाने आशियाई हॉकी करंडकातील सलामीच्या लढतीत थायलंडचा ११-० अशा फरकाने धुव्वा उडवला. भारतीय संघातील आठ खेळाडूंनी गोल करण्याचा मान संपादन केला. उदिता डुहान व ब्युटी डुंग डुंग यांनी प्रत्येकी दोन गोल करताना आपला ठसा उमटवला. भारतीय महिला संघाने ब गटामधून तीन गुणांसह पहिले स्थान पटकावले.