
इराणमधील तेहरान येथे आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद २०२५ स्पर्धा सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात यश मिळवलं आहे.
भारतीय संघ या स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरला होता. त्यामुळे गतविजेत्याला साजेशी कामगिरी त्यांनी केली आहे.
शुक्रवारी या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढती पार पडल्या. पहिल्या उपांत्य फेरीत भारतासमोर नेपाळचे आव्हान होते. भारतीय महिलांनी हा उपांत्य सामना ५६-१८ अशा फरकाने एकतर्फी जिंकला आणि अंतिम सामना गाठला.