
स्पर्धेतील आपल्या पहिल्याच साखळी सामन्यात पराभवाची झळ सोसणार्या रायगडच्या मिडलाइन अॅकॅडमीने ठाणे महानगरपालिकेला धक्का देत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली.
मिडलाइनने ठाणे महानगर पालिकेचे आव्हान ३२-२२ असे सहज परतावून लावत प्रभादेवीत पहिल्यांदाच जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत जयश्री सावंत क्रीडानगरीत अंतिम सामना पाहाण्यासाठी हजारोच्या संख्येने कबड्डीप्रेमींनी तूफान गर्दी केली होती. पण प्रेक्षकांना अपेक्षित थरार अनुभवता आला नाही.