Football News : फुटबॉल विश्‍वकरंडक भारतात खेळवण्याची तयारी

सौदीमधील स्पर्धेतील काही सामने आयोजित करण्याचा प्रयत्न
footboll
footbollsakal

नवी दिल्ली ; ऑलिंपिक या क्रीडा महोत्सवाच्या आयोजनासाठी पुढाकार घेण्यात आल्यानंतर जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुटबॉल या खेळाच्या विश्‍वकरंडकातील काही लढतींच्या आयोजनासाठी अखिल भारतीय फुटबॉल संघटनेकडून (एआयएफएफ) प्रयत्न करण्यात येत आहेत. सौदी येथे २०३४ मध्ये फिफा विश्‍वकरंडक आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील काही लढती भारतात खेळवण्यासाठी कंबर कसली आहे, अशी माहिती एआयएफएफचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी दिली.

२०३४ मधील विश्‍वकरंडकाच्या आयोजनासाठी सौदी अरेबिया या एकमेव देशाचा प्रस्ताव फिफाकडे आला होता. आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनकडूनही सौदी अरेबियाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. एआयएफएफकडून सौदी अरेबियाला आयोजनासाठी पाठिंबा देण्यात आला. अखेर फिफाकडून सौदी अरेबियाला विश्‍वकरंडकाच्या आयोजनाचा मान देण्यात आला.

४८ संघ व १०४ सामने

२०३४ मध्ये सौदी अरेबिया येथे विश्‍वकरंडक होणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये जगभरातून ४८ देशांचा सहभाग असणार आहे. तसेच संघ वाढल्यामुळे या स्पर्धेमधील लढतीही वाढणार आहेत. तब्बल १०४ सामन्यांनंतर या स्पर्धेचा जेता ठरणार आहे.

कार्यकारिणी बैठकीत चर्चा

एआयएफएफची कार्यकारिणीची बैठक ९ नोव्हेंबरला पार पडली. या बैठकीत कल्याण चौबे यांनी विश्‍वकरंडकातील काही सामने भारतात आयोजित करण्यासाठी योजना आखायला हवी याबाबत आपले मत व्यक्त केले. १०४ लढतींपैकी किमान दहा लढती भारतात खेळवण्यात याव्यात यासाठी प्रयत्न व्हायला हवा असे त्यांचे म्हणणे होते.

... तर भारतही खेळणार

भारताकडून सहयजमानपदाचा प्रस्ताव ठेवण्यात आला तर मग फिफा विश्‍वकरंडकात भारतीय संघही सहभागी होईल. कारण यजमान संघाला पात्रता फेरीविना स्पर्धेत प्रवेश दिला जातो. भारतीय फुटबॉल क्षेत्रासाठी ही ऐतिहासिक व संस्मरणीय घटना असणार आहे\

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com