
मैदानात नांगर टाकून उभा असलेल्या पुजाराचा संयम तोडण्यात कमिन्सला यश मिळाले.
Aus vs Ind 3rd Test Day 3 : भारतीय संघाचा पहिला डाव 244 धावांत आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. मोहम्मद सिराजने सलामीवीर आणि कसोची पदार्पणात अर्धशतकी खेळी करणाऱ्या विल पुलोवस्कीला बाद करत भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले आहे. संघाच्या धावफलकावर 16 धावा असताना पुलोवस्कीने विकेट गमावली. त्याने 10 धावा केल्या. अनुभवी फिरकीपटू अश्विनने डेविड वॉर्नरला पायचित करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. वॉर्नर अवघ्या 13 धावा करुन माघारी फिरला आहे.
हेजलवूडने धावबादच्या रुपात हनुमा विहारीला बाद केले. त्याने 38 चेंडू खेळून केवळ 4 धावांची भर घातली. त्यानंतर ऋषभ पंतने पुन्हा एक संधी दवडली. 67 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने 36 धावा करणाऱ्या पंतला हेजलवूडने तंबूचा रस्ता दाखवला. दुसऱ्या बाजूला नांगर
टाकून उभा असलेल्या पुजाराचा संयम तोडण्यात कमिन्सला यश मिळाले. उसळत्या चेंडूवर ग्लोव्जला चेंडू लागून त्याने यष्टीमागे झेल दिला. 176 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने त्याने 50 धावा केल्या. धावफलकावर 206 धावा असताना अश्विनच्या रुपात भारतीय संघाला 7 वा धक्का बसला. 10 धावांची भर घालून धावबाद झाला. स्टार्कने सैनीच्या रुपात टीम इंडियाला 8 वा धक्का दिला आहे. बुमराह खातेही न खोलता रन आउट झाला. कमिन्सने मोहम्मद सिराजला 6 धावांवर बाद करत भारतीय संघाचा डाव 244 धावांतच आटोपला. रविंद्र जडेजा 28 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने 94 धावांची आघाडी घेतली असून आता ते टीम इंडियासमोर किती धावांचे लक्ष्य ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.