
भारतीय संघातील सर्व खेळाडू आणि स्टाफ सदस्यांची 3 जानेवारीला घेण्यात आलेली कोविड-19 ची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.
Aus vs Ind Test Series : कोविड-19 प्रोटोकॉल नियमाचे उल्लंघन केल्यामुळे वादात सापडलेल्या टीम इंडियाला दिलासा देणारी बातमी आहे. 3 जानेवारीला मेलबर्नमध्ये भारतीय खेळाडूंची झालेली कोरोना चाचणीचे रिपोर्ट आले असून संघातील सर्व खेळाडूंचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. बीसीसीआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
या टेस्ट रिपोर्टमुळे भारतीय संघाचा सिडनीच्या दिशेने जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 8 विकेट्सनी विजय मिळवत टीम इंडियाने मालिकेत बरोबरी साधली आहे. सिडनीचे मैदान मारून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही उत्सुक असतील.
Biggest positive from Melbourne: Indian players test negative for coronavirus
Read @ANI Story | https://t.co/B6RfnazOUf pic.twitter.com/hD2JWUnnAB
— ANI Digital (@ani_digital) January 4, 2021
एएनआयने बीसीसीआयचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघातील सर्व खेळाडू आणि स्टाफ सदस्यांची 3 जानेवारीला घेण्यात आलेली कोविड-19 ची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मासह संघातील पाच खेळाडूंनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करुन कोविड 19 च्या नियमांचे उल्लंघन केल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. त्यामुळे हे रिपोर्ट टीम इंडियाला दिलासा देणारा असाच आहे.
"ब्रिस्बेनमधील ऑस्ट्रेलियन संघाच्या रेकॉर्डमुळे टीम इंडियाला धडकी भरलीय"
तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघातील खेळाडूंनी कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याच्या वादग्रस्त चर्चेशिवाय चौथ्या आणि अखेरच्या ब्रिस्बेनमधील कसोटी सामन्यासंदर्भातली अनेक चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय संघ ब्रिस्बेनमध्ये खेळावे की नाही याचा विचार करत आहे. क्वीन्सलंड राज्य सरकारने खेळायला येणाऱ्या खेळाडूंनाही सर्व सामन्यांप्रमाणेच नियमाचे पालन करावे लागेल, असे सुनावले आहे. त्यामुळे यासंदर्भात नेमकं काय होणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.