T20WC : ऑस्ट्रेलियाच्या विजयाने इंग्लंडची गोची, आयर्लंडला हरवून पॉइंट टेबलमध्ये...

ऑस्ट्रेलियाने आयर्लंडचा 42 धावांनी केला पराभव, यासह गुणतालिकेत...
Australia vs Ireland T20 World Cup 2022 :
Australia vs Ireland T20 World Cup 2022 :sakal

Australia vs Ireland T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषकाच्या महत्त्वपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाने आयर्लंडचा 42 धावांनी पराभव केला. गाबा येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 5 बाद 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ 18.1 षटकांत केवळ 137 धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 42 धावांनी जिंकला.

Australia vs Ireland T20 World Cup 2022 :
T20 World Cup: टीम इंडियावर मोठं संकट, 'या' एका कारणामुळे वर्ल्ड कप मधून होऊ शकते गच्छंती

ऑस्ट्रेलियाच्या संघाने T20 विश्वचषकात आपला दुसरा विजय नोंदवला आहे. आयर्लंडवर विजय मिळवून ऑस्ट्रेलियाचे पाच गुण झाले असून ते न्यूझीलंडनंतर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. या आधी इंग्लंड संघ दुसऱ्या स्थानावर होता तर आयर्लंड तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र या विजयानंतर ऑस्ट्रेलिया दुसरा क्रमांक वर आली आहे.

Australia vs Ireland T20 World Cup 2022 :
Virat Kohli Leaked Video: कोहलीच्या रूम मधला व्हिडिओ व्हायरल करणारा सापडला; हॉटेलने केली 'ही' कारवाई

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने आयर्लंडसमोर 180 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. निर्धारित 20 षटकांत कांगारू संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 179 धावा केल्या. कर्णधार फिंचने सर्वाधिक 63 धावा केल्या. मार्कस स्टॉइनिसने 35 आणि मिचेल मार्शने 28 धावा केल्या. आयर्लंडकडून मॅकार्थीने तीन आणि जोशुआ लिटलने दोन बळी घेतले. कर्णधार अॅरॉन फिंचचे पुनरागमन ऑस्ट्रेलियासाठी दिलासा देणारी बातमी आहे. फिंचला योग्य वेळी त्याची लय सापडली आहे.

Australia vs Ireland T20 World Cup 2022 :
Video : धडकी भरवणारी झेप, नेटकरी टीम इंडियाला देतायत मॅकार्थीकडून शिकायचा सल्ला...

180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडची सलामी अत्यंत खराब झाली. 25 धावांवर संघाच्या पाच विकेट पडल्या. त्यानंतर एका क्षणी असे दिसत होते की टकर आयर्लंडला स्वतःच्या बळावर विजय मिळवून देऊ शकेल, परंतु आयर्लंडचा संघ 18.1 षटकांत 137 धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून कमिन्स, स्टार्क, मॅक्सवेल आणि झाम्पा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी हेजलवूडला एक विकेट मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com