FIFA WC22 : पराभवानंतर पोर्तुगालचा 'बेईमानी'चा आरोप, म्हणे ट्रॉफी मेस्सीच्या अर्जेंटिनालाच द्या!

You can give Argentina the title Portugal players Pepe Bruno Fernandes slam referee after FIFA World Cup Qatar 2022 exit
You can give Argentina the title Portugal players Pepe Bruno Fernandes slam referee after FIFA World Cup Qatar 2022 exit sakal

FIFA World Cup Qatar 2022 : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषकाच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालच्या संघाचा मोरोक्कोसमोर पराभव झाल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोला मोठा धक्का बसला आहे. मोरक्कन संघाने अल थुमामा स्टेडियमवर पोर्तुगालचा 1-0 ने पराभत करत उपांत्य फेरी गाठली. या पराभवामुळे पोर्तुगालचे खेळाडू निराश झाले आहेत. रेफ्रींबाबतही त्यांनी फिफावर टीका केली आहे.

अनुभवी फुटबॉलपटू पेपे आणि मिडफील्डर ब्रूनो फर्नांडीस यांनी सामन्यात अर्जेंटिनाच्या रेफ्रींच्या पुनर्स्थापनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अर्जेंटिनाला वर्ल्डकपमध्ये चॅम्पियन बनवण्याचा कट रचला जात असल्याचे दोघांनी सांगितले आहे. पेपेने पोर्तुगीज टेलिव्हिजनवर सांगितले की, आमच्या सामन्यात अर्जेंटिनाचा रेफ्री असणे योग्य नव्हते. पेपे यांनी अर्जेंटिना आणि नेदरलँड यांच्यातील सामन्याचा संदर्भ दिला. लिओनेल मेस्सीने सामन्यानंतर रेफ्रींवर टीका केली होती.

You can give Argentina the title Portugal players Pepe Bruno Fernandes slam referee after FIFA World Cup Qatar 2022 exit
FIFA WC22 : हॅरी केनचा पेनल्टीवर गोल चुकला अन् इंग्लंड बाहेर! फ्रान्स थाटात उपांत्य फेरीत

सामना संपल्यानंतर पेपे म्हणाला की, "दुसऱ्या हाफमध्ये आम्ही काहीच कळलं नाही. त्यांचा गोलकीपर दुखापतीमुळे जमिनीवर भरपूर वेळ पडला राहिला आणि आम्हाला फक्त आठ मिनिट वेळ देण्यात आली. आम्ही कठोर खेळ केला आणि रेफ्रींनी फक्त आठ मिनिटे जोडली. तो रेफ्री हा अर्जेंटिनाचा आहे हे आम्हाला माहिती आहे.

You can give Argentina the title Portugal players Pepe Bruno Fernandes slam referee after FIFA World Cup Qatar 2022 exit
Cristiano Ronaldo In Tears : सुपरस्टार रोनाल्डो ढसाढसा रडला! व्हिडिओ व्हायरल

फेसुंडो टेल्लोचा हा पहिलाच विश्वचषक आहे. 2019 मध्ये त्याला फिफा रेफरी पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आले. फेसुंडो टेल्लोने कतारमध्ये दोन सामने रेफर केले आहेत. ब्रुनो फर्नांडिस यांनी फिफावर टीका केली की, आम्हाला आधीच माहित आहे की येथे गोष्टी कशा चालतात. सामना सुरू होण्यापूर्वीच आम्हाला कोणत्या रेफ्रींचा सामना करावा लागेल याची आम्हाला कल्पना होती. दुर्दैवाने पोर्तुगालकडे या स्पर्धेसाठी पंच नाही. या स्पर्धेत अजूनही राहिलेल्या देशांचे रेफरी येथे आहेत. अर्जेंटिनाला ट्रॉफी द्यायची आहे. तसे असेल तर त्यांनी ट्रॉफी आधीच द्यायला हवी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com