सिनेसृष्टीवर काळाचा घाला! ऑस्कर जिंकणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय अभिनेत्याचं निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hollywood Actor Sidney Poitier

काही लोक मृत्यूनंतरही अमर राहतात. कधी व्यक्तिमत्वामुळं तर कधी कामामुळं.

ऑस्कर जिंकणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय अभिनेत्याचं निधन

काही लोक मृत्यूनंतरही अमर राहतात. कधी व्यक्तिमत्वामुळं तर कधी कामामुळं. सिनेसृष्टीत इतिहास रचणारे ज्येष्ठ अभिनेते सिडनी पॉटियर (Sidney Poitier) हे देखील असंच एक व्यक्ती होतं, त्यांना कधीही विसरता येणार नाही. सिडनी पॉटियर हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा 'ऑस्कर पुरस्कार' जिंकणारा पहिला कृष्णवर्णीय अभिनेता होता. गुरुवारी ज्येष्ठ अभिनेते सिडनी यांनी जगाचा निरोप घेतला.

सिडनी पॉटियर 94 वर्षांचे होते. बहामियन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं शुक्रवारी पॉटियर यांच्या निधनाची माहिती दिली. बहामासचे पंतप्रधान लतरे राहमिंग Latrae Rahming यांनी, गुरुवारी लॉस एंजेलिस येथील त्यांच्या घरी जावून पॉटियर यांना श्रध्दांजली अर्पण केली. 'लिलीज ऑफ द फील्ड' (Lilies of the Field) या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सिडनी यांना 1964 मध्ये ऑस्कर मिळाला होता. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती होते.

सिडनी यांनी 1950 आणि 1960 च्या दशकात आपल्या कामाद्वारे अमेरिकेत बदल घडवून आणला. ज्यावेळी देशात वर्णद्वेष वाढत होता, तेव्हा सिडनीच्या कार्यानं नागरिकत्व हक्क चळवळ आणि फुटीरतावादी यांसारख्या समस्यांना आव्हान दिलं होतं. सिडनी पॉटियरच्या काही प्रसिद्ध चित्रपटांमध्ये 'लिलीज ऑफ द फील्ड' Lilies of The Field, 'द डिफिएंट वन्स' The Defiant Ones, 'अ पॅच ऑफ ब्लू' A Patch of Blue, 'ए रेझिन इन द सन' A Raisin in the Sun इत्यादींचा समावेश आहे. थिएटरच्या मालकांनी सिडनी यांना 1967 मध्ये वर्षातील नंबर 1 स्टार घोषित केलं होतं. कृष्णवर्णीय अभिनेत्याची ही पहिलीच कामगिरी होती.

टॅग्स :Bollywood Newshollywood