
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार प्रशिक्षक बॉब सिम्पसन यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करण्यात सिम्पसन यांचा मोठा वाटा होता. कसोटी करिअरच्या दोन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विक्रम नोंदवले. कर्णधार म्हणून सर्वात कमी वयात कसोटीत त्रिशतक करण्याचा त्यांचा विक्रम ६१ वर्षे अबाधित होता. निवृत्तीनंतर त्यांनी पुन्हा ऑस्ट्रेलिया संघाचं प्रतिनिधीत्व केलं होतं. १९८७ मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. त्या संघाचे प्रशिक्षक सिम्पसन होते.