T20 World Cup 2026
esakal
Australia face a major setback ahead of the T20 World Cup : शनिवारपासून टी-२० विश्वकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र, त्यापूर्वी ऑस्ट्रेलिया एक मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आधीच पॅट कमिन्स दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. अशातच आता हेजलवूडही बाहेर पडल्याने ऑस्ट्रेलिया संघाकडे अनुभवी वेगवान गोलंदाजांची पोकळी निर्माण झाली आहे.