esakal | Ashes 2019 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंना कितीवेळा म्हटले विकेट गमावू नका पण...
sakal

बोलून बातमी शोधा

Australia looses two wickets early in 4th test of ashes 2019

ऍशेस मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला आज सुरवात झाली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेत चांगली सुरवात केली. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल वॉनने संघाला पहिल्या सत्रात विकेट न गमाविण्याचा सल्ला दिला मात्र, सलामीवीरांनी काही त्यांचे ऐकले नाही. 

Ashes 2019 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंना कितीवेळा म्हटले विकेट गमावू नका पण...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मॅंचेस्टर : ऍशेस मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला आज सुरवात झाली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेत चांगली सुरवात केली. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल वॉनने संघाला पहिल्या सत्रात विकेट न गमाविण्याचा सल्ला दिला मात्र, सलामीवीरांनी काही त्यांचे ऐकले नाही. 

नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ''खेळपट्टी कोरडीठाक असल्याने याचा ऑस्ट्रेलियाला याचा फायदा घेता येईल फक्त त्यांनी पहिल्या सत्रात पाच किंवा जास्त विकेट गमावायला नकोत'' असे मत वॉन यांनी व्यक्त केले. 

मात्र, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी काही त्यांचे ऐकले नाही. विकेट गमावू नका म्हटल्यावर त्यांचा धावफलक 1-1 असा झाला होता. कारण सलामीवीर वॉर्न भोपळाही न फोडता बाद झाला. त्याच्यापाठोपाठ मार्कस हॅरिससुद्धा केवळ 13 धावा करुन बाद झाला. त्यानंतर आता मार्नस लाबुशेन आमि स्टिव्ह स्मिथ फलंदाजी करत आहेत.

loading image
go to top