AUS vs ENG : जॉनीची 'शानदार' सेंच्युरी; इंग्लंड 250 पार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jonny Bairstow

इंग्लंडच्या संघाने 7 बाद 258 धावा केल्या होत्या. इंग्लंड अजूनही 158 धावांनी पिछाडीवर आहे.

AUS vs ENG : जॉनीची 'शानदार' सेंच्युरी; इंग्लंड 250 पार!

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही पाहुण्या इंग्लंडची अवस्था बिकट दिसत आहे. आघाडीच्या गडी स्वस्तात माघारी फिरल्यानंतर बेन स्टोक्स आणि जॉनी बेयरस्टोनं संघाचा डाव सावरला. या जोडीनं पाचव्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी केली. बेन स्टोक्स 91 चेंडूत 66 धावा करुन परतल्यानंतर जॉनी बेयरस्टोनं शतकी खेळी केली. तो दिवसाखेर नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या संघाने 7 बाद 258 धावा केल्या होत्या. इंग्लंड अजूनही 158 धावांनी पिछाडीवर आहे.

जॉनी बेयरस्टोनं आपल्या शतकी खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार खेचले. 140 चेंडूत 103 धावांच्या नाबाद खेळीमुळे इंग्लंड सुस्थितीत आला असला तरी त्यांच्यावरील पराभवाच संकट अजूनही टळलेलं नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या तीन कसोटी सामन्यातील विजयासह मालिका आधीच खिशात घातली आहे.उर्वरित दोन सामन्यात इंग्लंडची प्रतिष्ठपणाला लागली आहे. त्यांना तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखता आला तरी ती मोठी गोष्टच असेल. इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन स्टोक्स आणि जॉनी बेयरस्टोशिवाय मार्क वूडनं 39 धावांची उपयुक्त खेळी केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंड यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. लायन, कॅमरुन ग्रीन, मिशेल स्टार्क यांना प्रत्येकी एक -एक विकेट मिळाली.

हेही वाचा: त्याला कैद्यासारख ठेवलंय; जोकोविच्या आईचा अधिकाऱ्यांवर आरोप

ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 8 बाद 416 धावांवर घोषित केला होता. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजानं 260 चेंडूचा सामना करताना 137 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार खेचले. त्याच्याशिवाय स्मिथनं 5 चौकाराच्या मदतीने 141 चेंडूत 67 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडनं सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. जेम्स अँडरसन, मार्क वूड आणि जो रुट यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

हेही वाचा: VIDEO : नंबर वन बॉलरला मार्क वूडचा कडक सिक्सर, गिलस्पीही फिदा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top