कांगारुंच्या तावडीतून 'लायन्स'ची सुटका कोण करणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Australia vs England 4th Test Day 4

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला विजयी चौकार खेचण्यासाठी 10 विकेट्सची गरज आहे.

कांगारुंच्या तावडीतून 'लायन्स'ची सुटका कोण करणार?

Australia vs England 4th Test Day 4 : अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Test ) चौथ्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया (Australia Team) मजबूत स्थितीत आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावात 11 षटक खेळून 30 धावा केल्या होत्या. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी अजून 358 धावा करायच्या आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला विजयी चौकार खेचण्यासाठी 10 विकेट्सची गरज आहे. इंग्लंडचा संघासाठी सामना जिंकणं जवळपास मुश्किल आहे. ते पाचव्या आणि अखेरच्या दिवशी कसोटी अनिर्णित राखण्याचा प्रयत्न करतील.

चौथ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 294 धावांत आटोपून ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. उस्मान ख्वाजानं (Usman Khawaja) दुसऱ्या डावात दुसरं शतक झळकावलं. तो 101 धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या बाजूला कॅमरुन ग्रीन (Cameron Green) याने 72 धावांची खेळी केली. या दोघांच्या दमदार फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 6 बाद 265 धावांवर घोषीत करत इंग्लंडसमोर 388 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावात ज्या सहा विकेट गमावल्या यात जॅक लीच (Jack Leach) च्या चार विकेट आणि मार्क वूड (Mark Wood) च्या दोन विकेट्सचा समावेश होता.

हेही वाचा: Ashes Record : स्मिथच्या नावे खास विक्रमाची नोंद

इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून झॅक क्राउले (Zak Crawley) आणि हसीब हमीद (Haseeb Hameed) यांनी पहिल्या विकेटसाठी नाबाद 30 धावांची खेळी केली आहे. पहिल्या डावात 22 धावांतच ही जोडी फुटली होती. जर इंग्लंडला कांगारुंकडून पराभव टाळायचा असेल तर या जोडीला नावाला साजेसा खेळ करायला पाहिजे. जर ही जोडी फुटली आणि जो रुटस मिडल ऑर्डरचा फ्लॉप शो पुन्हा दिसला तर इंग्लंडवर सलग चौथ्या पराभवाची नामुष्की ओढावू शकते.

हेही वाचा: पाकिस्तानच्या कर्णधाराची ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाला 'मॅच फिक्सिंग'ची ऑफर

इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन स्टोक्सनं अर्धशतकी खेळी केली होती. त्याच्याव्यतिरक्त जॉनी बेयरस्टोनं शतकी खेळी करुन संघाला सावरलं होते. या दोघांकडून पुन्हा एकदा चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. त्यांच्याशिवाय जो रुटला मैदानात तग धरुन उभा रहावे लागेल. मालिकेत इंग्लंडची अवस्था बिकट आहे. त्यांनी हा सामना वाचवला तरी इंग्लंडसाठी हा मोठा दिलासाच असेल.

Web Title: Australia Vs England 4th Ashes Test Day 4 Stumps England Need 358 Runs Last And Final Day

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top